अमर्याद (विशेषण)
सीमांनी बांधला न गेलेला.
चुरस (नाम)
दुसर्याहून वरचढ होण्याचा प्रयत्न.
कदन्न (नाम)
हलक्या प्रतीचे व जाडेभरडे अन्न.
डिंक (नाम)
बाभळ, खैर, शेवगा इत्यादी झाडांपासून निघणारा चिकट पदार्थ.
स्तंभ (नाम)
एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
संन्यासी (नाम)
संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.
सदरा (नाम)
आर्धी बाही वा पूर्ण बाह्यांचा, कंबरे पर्यंत लांबीचा एक परिधान.
इच्छा (नाम)
ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
घुबड (नाम)
चेहर्यावर समोरच्या बाजूस डोळे असणारा, बाकदार पण आखूड चोच असलेला, कावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, एक निशाचर, शीकारी पक्षी.
यती (नाम)
मनोविकारास ताब्यात ठेवणारा.